Sunday, September 13, 2026
Homeसाताराखा. शरद पवार यांची सभा फलटणमध्ये: राजकीय वातावरण तापले!

खा. शरद पवार यांची सभा फलटणमध्ये: राजकीय वातावरण तापले!

फलटण :- फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असताना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार आमदार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्या, 16 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता गजानन चौक, फलटण येथे जाहीर सभा होणार आहे.

या सभेत आमदार दीपक चव्हाण यांच्यासह फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि तालुक्यातील इतर मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

अजित पवार यांच्या टीकेला उत्तर?
काही दिवसांपूर्वी साखरवाडी येथे झालेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली होती. यावर खा. शरद पवार सभेत काय भूमिका मांडणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राजे गटाचे राजकीय समीकरण
राजे गटाने सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासोबत असलेली निष्ठा कायम ठेवली होती. मात्र पक्षात झालेल्या फाटाफुटीनंतर रामराजे व राजे गटाने अजित पवारांच्या महायुतीत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीत स्थानिक राजकारणाच्या विरोधात भूमिका घेत त्यांनी महाविकास आघाडीसोबत राहून धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार गटात प्रवेश करत राजकीय समीकरणे बदलली आहेत.

याच पार्श्वभूमीवर खा. शरद पवार यांची सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments