
आणीबाणीतही जे झालं नाही, ते आता होतंय!
‘ईडी, सीबीआयचा वापर करणं, निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे. केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळंच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे, असा दावा पवारांनी केला.





