
Sharad Mohol Murder planning : शरद मोहोळ पुण्यातील कुख्यातगुंड असून त्याच्यावरहत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गुन्हेनोंद आहेत. जर्मन बेकरी स्फोटातील संशयित दहशतवाद्याला मोहोळ याने तुरुंगातच मारले होते. त्यानंतर त्यांची हिंदू डॉन अशी ओळख निर्माण झाली होती. तब्बल १५ वर्ष दहशत माजवल्यावर अखेर याच गुंडगिरीने त्याचा जीव घेतला. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर व नामदेव कानगुडे हा शरद मोहोळ याच्या हत्येचा मास्टर माइंड होता. शरद मोहोळला मारण्यासाठी त्याने महिन्याभरपासून प्लॅनिंग केले होते. या साठी त्याने त्याची माणसं मोहोळच्या टोळीत घुसवले. त्यांनी शरद मोहोळचा विश्वास संपादन करून एखादा सिनेमाच्या कथानका प्रमाणे त्याचे बॉडीगार्ड होऊन त्याची शुक्रवारी हत्या केली.






