
या खास प्रसंगी शाहरुख खानने त्याच्या चाहत्यांसाठी ‘आस्क मी सेशन’चे आयोजन केले होते. यावेळी शाहरुख खानच्या चाहत्यांनी त्याला अनेक प्रश्न विचारले, ज्याची उत्तरेही किंग खानने अतिशय मजेशीर दिली आहेत. आस्क मी सेशन सुरू करताना शाहरुखने लिहिले की, ‘वाह, दिवाना प्रदर्शित होऊन आज ३१ वर्षे पूर्ण झाली. खूप छान होता हा प्रवास… सर्वांचे आभार आणि आता आपण ३१ मिनिटांसाठी#AskSRK करूया?’







