
मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान या क्षणी पुन्हा ‘डॉन’ म्हणून मोठ्या पडद्यावर परत येण्यास फारसा उत्सुक नाही. त्याला आता प्रेक्षकांना आवडेल असे व्यावसायिक चित्रपट करायचे आहेत. तर, शाहरुख सध्या ज्या प्रकारचे सिनेमे करू पाहतोय त्यात ‘डॉन’ सारखा चित्रपट बसत नाही. या रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने आपला निर्णय फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांच्या एक्सेल एंटरटेनमेंटला देखील कळवला आहे. तर, त्याच्या या निर्णयानंतर आता त्याच्या जागी नव्या अभिनेत्यासाठी शोधशोध सुरू झाली आहे.








