
१९६२ साली सीमा आणि रमेश देव यांनी ‘वरदक्षिणा’ या चित्रपटात एकत्र काम केले. हा त्यांचा पहिला एकत्र चित्रपट होता. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी दस लाख, सरस्वतीचंद्र, आनंद, नसीब अपना अपना, संसार या चित्रपटात काम केले. १९७१ साली सीमा आणि रमेश यांनी मुंबईत प्रोडक्शन हाउस उभे केले. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.







