School Uniform : सरकारचा मोठा निर्णय.. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’

0
16
School Uniform : सरकारचा मोठा निर्णय.. पुढच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात ‘एक राज्य, एक गणवेश’


राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून पुढील शैक्षणिक वर्ष म्हणेज २०२४-२५ पासून ‘एक राज्य, एक गणवेश’ या लागू होणार आहे. सरकारच्या समग्र शिक्षण कार्यक्रमांतर्गत तसेच, राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेतंर्गत सरकारी शाळांमधील इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना समान रंगाच्या दोन गणवेशांचे वितरण महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून करण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून  जारी  करण्यात आला आहे.



Source link