फलटणमध्ये 15 वर्षानंतर अनुसूचित जाती-जमाती दक्षता समितीची बैठक; दलित अन्यायाविरोधात ठरला नवा टप्पा

0
11
फलटणमध्ये 15 वर्षानंतर अनुसूचित जाती-जमाती दक्षता समितीची बैठक; दलित अन्यायाविरोधात ठरला नवा टप्पा

फलटण, दि. 20 ऑगस्ट –फलटण शहरात तब्बल 15 वर्षांनंतर अनुसूचितजाती-जमाती दक्षता समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत 1 ते 47 मुद्यांवर सविस्तर वाचन करून चर्चा करण्यात आली. दलित बहुजन समाजावरील अन्यायाविरोधात ठोसपणे आवाज उठविण्यासाठी या बैठकीने कायदेशीर व्यासपीठ उपलब्ध करून दिले.

गेल्या 15 वर्षांत राजे गटातील तथाकथित “महान नेत्यांनी” दलित बहुजनांवर होणाऱ्या अन्यायासमोर मौन बाळगले होते. मात्र, सत्ता बदलानंतर आमदार सचिनजी कांबळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन सदस्यांना संधी मिळाली असून दलित समाजाच्या प्रश्नांसाठी लढण्याची दिशा मिळाली आहे.

या समिती बैठकीचे सर्वात मोठे योगदान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचे असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या चर्चेत विशेष सरकारी वकील ॲड. बापूसाहेब शिलवंत, वैभव गीते, माजी नगरसेवक वैशालीताई अहिवळे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. तसेच उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ व पोलीस प्रशासनाचे शासकीय अधिकारीही हजर होते.

बैठकीच्या शेवटी माजी नगरसेवक सचिन अहिवळे सर यांनी प्रशासनाचे आभार मानून समारोप केला.