
नेत्राबरोबरच इंद्राणीही ग्रंथ मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती बंटी आणि रूपालीचा पिच्छा पुरवत आहे. एकीकडे हे सर्व घडत असताना मालिकेत आता अव्दैतला लग्नानंतर नेत्राचा मृत्यू अटळ आहे, हे कळणार आहे. त्यामुळे निरागस मनाचा अव्दैत अतिशय हळवा झाला आहे. त्याला वाटतं की लग्नाचं नातं तोडलं तर कदाचित नेत्राचा जीव वाचू शकेल, पण त्याचा हा प्रयत्न निष्फळ ठरतो. या दरम्यान राजाध्यक्ष कुटुंबात अशा काही घडामोडी घडतात की अव्दैतला नेत्रापासून दूर राहणं शक्य होत नाही. या दरम्यान नेत्रा लग्नाचं नातं तुटू नये, यासाठी अव्दैतला समजावत राहते. आता अव्दैत नेत्राचा जीव वाचवण्यासाठी काय करणार, जशी नेत्रा आजवर त्याचं रक्षाकवच बनून सतत सावलीसारखी त्याच्यासोबत राहिली तसा अव्दैत नेत्राचं रक्षाकवच होणार का, हे आपल्याला महाएपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.






