
सतीश कौशिक यांच्या निधनाचे दु:ख व्यक्त करत अनुपम खेर यांनी म्हटले आहे की, “मला माहिती आहे की, मृत्यू हे जगातील शेवटचे सत्य आहे. पण मी माझ्या जीवनात असा कधीच विचार केला नव्हता की, माझ्या जवळच्या मित्राबाबत मला कधी असे लिहावे लागेल. मी स्वप्नातही विचार केला नव्हता की, आमच्या ४५ वर्षाच्या मैत्रीला अचानक पूर्णविराम लागेल. सतीश तुझ्याशिवाय माझे आयुष्य पहिल्यासारखे राहणार नाही, अशा आशयाचे अनुपम खेर यांनी ट्विट केले आहे.