
विकास आणि सतिश कौशिक यांचे १५ कोटीच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. विकास आणि कौशिक दोघे जुने दोस्त होते. विदेशात एकदा कौशिक विकासकडून आपले पैसे घ्यायला आले होते. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर पैसे देईल असे सांगून विकास यांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती. विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप विकास यांची पत्नी सान्वीने केले आहेत.






