
सातारा: स्थानिक स्वराज्य संस्था आणि पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा पार पडला.
यावेळी आगामी निवडणुकांमध्ये पक्षबांधणी कशी मजबूत करायची, प्रभावी प्रचारयोजना कशी राबवायची, तसेच पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवून विजय मिळवण्याचा निर्धार यावर भर देण्यात आला.
कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी उपाध्यक्ष डॉ. क्रांती सावंत, वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे, सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे, सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे, पश्चिम जिल्हा महासचिव गणेश भिसे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यादरम्यान पक्षाची धोरणात्मक चर्चा, प्रचार योजना आखणी आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देणे यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले.








