
सारा अली खान विषयी बोलायचे झाले तर ती गेल्या काही दिवसांपासून अभिनेता कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर साराने प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम दिला. साराच्या कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वीच तिचा ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या चित्रपटात सारासोबतच विकी कौशल, राकेश बेदी, शारीब हाश्मी, नीरज सूद या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. याआधी साराचे ‘अतरंगी रे’, ‘केदारनाथ’, ‘लव्ह आज कल’, ‘कुली नंबर 1’, ‘गॅसलाइट’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.







