
लेखक हनीफ जावेरी आणि सुमंत बत्रा यांनी त्यांच्या आत्मचरित्रात याबद्दल लिहिलेलं आहे. हे प्रसिद्ध कपल कोणत्या कारणामुळे दुरावले याचेही कारण त्यात देण्यात आले आहेत. त्यात लिहिलेले आहे की ‘संजीव आणि हेमा मालिनी एका चित्रपटात गाण्याची शूटिंग करत होते. तेव्हा अचानक अपघात झाला आणि दोघांनाही जखमा झाल्या होत्या. त्यावेळीच ते दोघे एकत्र आले. दोघांना एकमेकांसोबत खुश पाहुन संजीव यांच्या आईने दोघांच्या लग्नासाठी मंजूरीही दिली होती. हेमा मालिनीही या संजीव यांच्या आईंचा फार आदर करायच्या. परंतु १९९१ मध्ये दिलेल्या एका मुलखातील हेमा मालिनी यांनी याबद्दल स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले होते की ‘संजीव यांना आईची सेवा करणारी एक विनम्र असलेली पत्नी हवी होती जी मी कधीही असू शकणार नाही, त्यांना माझ्याशी लग्न करायचे होते.’






