
खासदार राऊत हे सोलापूर दौऱ्यात आहेत. या दौऱ्यात संजय राऊत यांनी सायंकाळी सोलापूर-पुणे महामार्गावर बाळे येथे शिवसैनिकाने उभारलेल्या ‘हॉटेल लिमोर’चे उद्घाटन करण्यासाठी गेले होते. मात्र,तिथून परत येत असताना बाळे उड्डाणपुलावरून अज्ञात लोकांनी संजय राऊतांच्या वाहनावर चप्पलफेक केली. त्यांनी चप्पल फेकताना नारायण राणे जिंदाबादच्या घोषणा दिल्या, अशीही माहिती समोर आली.








