sanjay raut : …म्हणून मोदी-शहांनी इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल पटेल यांना परत केली; संजय राऊत यांनी संधी साधली!

0
18
sanjay raut : …म्हणून मोदी-शहांनी इकबाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल पटेल यांना परत केली; संजय राऊत यांनी संधी साधली!


हा न्याय सर्वांना लावावा!

‘हा ईडीच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. ईडी, सीबीआय ही भाजपची विस्तारित शाखा आहे असं मी म्हणतो त्याला कारणं आहेत. आता प्रफुल पटेल यांना मंत्री बनायचं आहे. त्याआधी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी प्रफुल्ल पटेल यांना परत दिली, असं ते म्हणाले. ’ईडीनं घेतलेल्या निर्णयाचा मला आनंद आहे. हाच नियम, हाच कायदा इतरांनाही लावला गेला पाहिजे. ज्यांच्यावर अन्याय्य पद्धतीनं जप्तीची कारवाई केली आहे, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. फक्त प्रफुल्ल पटेल यांनाचा का? पटेल यांच्याशी आमचं व्यक्तिगत शत्रुत्व नाही. पण न्याय सर्वांना समान हवा. कायदा एकच आहे ना. ईडी सगळ्यांसाठी आहे ना. हा ईडीच्या प्रतिष्ठेचा, विश्वासार्हतेचा प्रश्न आहे, असं राऊत म्हणाले.



Source link