Sanjay Raut : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हजारो कोटीचा घोटाळा केला: संजय राऊत यांचा आरोप

0
20
Sanjay Raut : भाजप आमदार प्रसाद लाड यांनी हजारो कोटीचा घोटाळा केला: संजय राऊत यांचा आरोप


साहू प्रकरणावर प्रतिक्रिया विचारली असता खासदार संजय राऊत म्हणाले, ‘काँग्रेस खासदाराकडे सापडलेल्या संपत्तीवर कायदेशीर कारवाई होईल. पण, केवळ काँग्रेस नेत्यांकडेच ही संपत्ती सापडते का? भाजपच्या नेत्यांकडे ईडी, सीबीआयचे अधिकारी का जात नाहीत? जर इंडिया आघाडीच्या खासदाराकडे २०० कोटी आढळून आले असतील तर भाजपा नेत्यांकडे १ लाख कोटी रुपये काळे धन आढळून येईल.’ अशी प्रतिक्रिया दिली. राऊत पुढे म्हणाले की भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी राज्यात हजारो कोटींचा घोटाळा केला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांचा १७८ कोटींचा घोटाळा आहे, तर भाजप आमदार राहुल कुल यांनीही घोटाळा केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. आम्ही ईडीकडे सतत तक्रार केली आहे. त्यांच्यावर कारवाई करा ना. ईडी आणि सीबीआय केवळ भाजप नेत्यांना संरक्षण देण्यासाठी बनवली असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला.



Source link