
मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर कोपरगाव तालुक्यतील धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. भरधाव गाडी रोडवरील दुभाजकाला धडकली. या अपघातामध्ये एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार नांदेडहून मुंबईकडे निघाली होती. मृतांची नावं अद्याप समोर आलेली नाहीत. भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.







