
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरातील पैठण तालुक्यातील रजापूर येथे आज (१७ डिसेंबर २०२४) सकाळी धक्कादायक घटना घडली. आईसोबत शेतात गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा विहिरीत बुडल्याने मृत्यू झाला. आई शेतात काम करत असताना हे दोन्ही मुले तिची नजर चुकवून खेळायला गेले. पण बराच वेळ होऊनही ते माघारी नाही. आईने दोघांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह जवळच्या विहिरीत तरंगताना दिसला. या घटनेची पोचोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.