Samantha Ruth Prabhu: मनोरंजन विश्वातून ब्रेक घेताच समंथा रुथ प्रभूने लूकच बदलला! व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत…

0
23
Samantha Ruth Prabhu: मनोरंजन विश्वातून ब्रेक घेताच समंथा रुथ प्रभूने लूकच बदलला! व्हिडीओ पाहून चाहते म्हणतायत…


या लूकमध्ये समंथा रुथ प्रभू हिने तिचे केस लहान केले आहेत. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर गोड हसू लेवून तिने आपली जबरदस्त स्टाईल दाखवली आहे. हिरव्या रंगाच्या ब्रालेट टॉपमध्ये समंथा खूपच सुंदर दिसत आहे. ही व्हिडीओ क्लिप शेअर करताना समंथाने हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत सगळ्यांनीच समंथाच्या या नव्या लूकचे खूप कौतुक केले आहे. तिचा हा लूक सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. समंथाच्या या लूकवर कमेंट करत अभिनेत्री हंसिका मोटवानीने लिहिले की, ‘नेहमीप्रमाणेच सुंदर.’ समंथाचा हा लूक पाहून चाहते तिला ‘इंडियन बार्बी’ म्हणत आहेत. अनेक लोक सुंदर, जबरदस्त आणि सुंदर अशा कमेंट करून तिची प्रशंसा करत आहेत.



Source link