Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅक होऊ शकते, मी यावर अभ्यास केलाय; सॅम पित्रोदा यांचा दावा

0
19
Sam Pitroda on EVM : ईव्हीएम हॅक होऊ शकते, मी यावर अभ्यास केलाय; सॅम पित्रोदा यांचा दावा


Sam Pitroda on EVM hacking : लोकसभा निवडणुकीदरम्यान वारसा हक्क कायद्यावर वादग्रस्त विधान करणाऱ्या सॅम पित्रोदा यांनी आता ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ईव्हीएम प्रणाली चांगली नसून बॅलेट पेपर पद्धतीने निवडणुका घेणे चांगले आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. पित्रोदा म्हणाले की, मत पत्रिकाद्वारे मतमोजणी करून विजय-पराजय ठरवणे ही सर्वोत्तम यंत्रणा आहे. सॅम पित्रोदा यांनी एक्सवर लिहिले की, ‘मी ६० वर्षांहून अधिक काळ इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकॉम सारख्या क्षेत्रात काम केले आहे. मी ईव्हीएम प्रणालीचा पूर्ण अभ्यास केला आहे. त्यामुळे ईव्हीएममध्ये छेडछाड केली जाऊ शकते तसेच ते हॅक केले जाऊ शकते. त्यामुळे मतपत्रिकेचा वापर करून निवडणुका घेणे उत्तम, असे पित्रोदा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.



Source link