
Sam Bahadur Box Office Collection Day 12: या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दोन मोठ्या चित्रपटांची तगडी टक्कर पाहायला मिळाली आहे. एकीकडे रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’चा धुमाकूळ सुरू आहे. तर, दुसरीकडे विकी कौशलचा ‘सॅम बहादूर’ हा चित्रपट संथ गतीने पुढे जाताना दिसत आहे. या चित्रपटाने कमाई कमी केली असली, तरी १२व्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर आपले स्थान टिकवून ठेवले आहे. ‘नीरजा’ आणि ‘राझी’सारखे उत्तम चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शिका मेघना गुलजारच्या ‘सॅम बहादूर’ला समीक्षक आणि चाहत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मात्र, व्यावसायिकदृष्ट्या हा चित्रपट तितकीशी छाप सोडू शकलेला नाही. पण, तरीही या चित्रपटाने आतापर्यंतच्या प्रेक्षकांना प्रभावित केले आहे.








