Monday, September 14, 2026
Homeसातारामहामानवांना अभिवंदन — फलटण व निंभोरे येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

महामानवांना अभिवंदन — फलटण व निंभोरे येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली

फलटण प्रतिनिधी :- भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण व परिसरात आदरांजलीचा भावनिक माहोल पाहायला मिळाला. सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते असलेल्या बाबासाहेबांच्या पुण्यस्मरणार्थ विविध मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले.

फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, अनिकेतराजे नाईक निंबाळकर आणि महेंद्र सूर्यवंशी बेडके यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी पत्रकार बापूराव जगताप, विकास काकडे, शक्ती भोसले, जय रणदिवे, पांडुरंग अहिवळे, अनिकेत अहिवळे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, निंभोरे येथील चैत्यभूमीवरही महापरिनिर्वाण दिनाची नोंद भावपूर्ण वातावरणात झाली. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी सहकाऱ्यांसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस श्रद्धांजली वाहिली. यावेळी अभिलाष काकडे, अमित रणवरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments