
Anant Ambani-Radhika Merchant Sangeet Ceremony: भारतीत सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. अनंत आणि राधिका १२ जुलै रोजी लग्न करणार आहेत. त्याच्या प्रीवेडींग कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान, या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉलिवूडचा भाईजान सलमान खान डान्स करताना दिसत आहे.







