
बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माते आनंद पंडित यांनी नुकताच आपला ६०वा वाढदिवस साजरा केला. त्यांनी वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांना आमंत्रण देण्यात आले होते. या पार्टीमधील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि सलमान खान हे तिघे एकत्र दिसले. हे तिघे फक्त एकत्र दिसलेच नाही तर त्यांनी एकमेकांना मिठीसुद्धा मारली आहे.







