Sajid Khan : अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा विचार केला! मीटूच्या आरोपांनंतर खचला होता साजिद खान

0
17
Sajid Khan : अनेक वेळा स्वतःला संपवण्याचा विचार केला! मीटूच्या आरोपांनंतर खचला होता साजिद खान


Sajid Khan Struggle Day :  गेल्या काही काळापासून मनोरंजन विश्वात ‘मी टू’ची प्रकरणे समोर येत आहे. अशाच एका प्रकरणात साजिद खानचे नाव देखील समोर आले होते. २०१८ मध्ये साजिद खान ‘हाऊसफुल ४’चे शूटिंग करत होता. या दरम्यान, साजिद खानवर काही महिलांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते, त्यानंतर साजिद खानच्या आयुष्यात मोठी उलथापालथ झाली होती. ‘मी टू’ अंतर्गत साजिद खानचं नाव समोर आलं तेव्हा त्याच्या हातून काम गेलं. त्याच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या आयुष्यातील कठीण टप्प्याबद्दल सांगितले. गेल्या सहा वर्षांत त्याने अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा खुलासा त्याने यावेळी केला.



Source link