
व्हायरल व्हिडीओनंतर सैफ अली खान याने त्यांच्या सिक्युरिटी गार्डला कामावरून काढून टाकल्याचे बोलले जात होते. मात्र, आता स्वतः सैफ या प्रकरणात बोलला असून, त्याने सगळ्या गोष्टींवर स्पष्टीकरण दिले आहे. सैफ अली खान म्हणाला की, ‘आम्ही कोणत्याही गार्डला नोकरीवरून काढून टाकलेले नाही. तसेच, कोणालाही निलंबित केलेले नाही. यात त्यांची काहीही चूक नाही. तसेच, आम्ही कोणत्याही मीडिया विरोधात केस दाखल करणार नाही.’