Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..

0
13
Sai Pallavi Birthday: अभिनेत्रीच नव्हे तर निष्णांत डॉक्टरही आहे साई पल्लवी! वाचा तिच्याबद्दल काही खास गोष्टी..


साई पल्लवी नेहमीच विना मेकअप चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. यामुळे ती सिनेप्रेमींमध्येही प्रचंड लोकप्रिय आहे. साई तिच्या चित्रपटांमध्ये क्वचितच मेकअप करताना दिसते. याच कारणामुळे साईने फेअरनेस क्रीमची दोन कोटींची जाहिरात देखील नाकारली होती. एका फेअरनेस क्रीमच्या जाहिरातीसाठी तिला विचारणा झाली होती. मात्र, तिने ही ऑफर धुडकावून लावली. साई पल्लवी म्हणते की, सुंदर दिसण्यासाठी मी मेकअप कधीच वापरत नाही आणि लोकांची दिशाभूल करणाऱ्या गोष्टीचा प्रचार करण्याचा भाग बनू इच्छित नाही. जे नैसर्गिक आहे, तेच चांगले आहे, असे म्हणत तिने ही जाहिरात उडवून लावली.



Source link