
हिंदी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या घराला आग लागली होती. बुधवारी १३ डिसेंबर रोजी अहमदनगर येथील सुमन अपार्टमेंटमधील त्याच्या फ्लॅटमध्ये ही दुर्घटना घडली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळ गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली.








