
Sabarmati Express derail : वाराणसीहून अहमदाबादला जाणारी १९१६८ साबरमती एक्स्प्रेसचा भीषण अपघात झाला आहे. ही गाडी रात्री अडीचच्या सुमारास भीमसेन स्थानकाजवळ रुळावरून घसरली. या गाडीचे २० डब्बे हे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. गाडीतील सर्व प्रवासी सुरक्षित आहे. प्रथमदर्शनी एक मोठा दगड इंजिनवर आदळला व यानंतर ही गाडी रुळावरून घरसल्याची माहिती आहे. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, दगडलागल्यामुळे इंजिनचा कॅटल गार्ड खराब झाला व गाडी ही रुळावरून घसरली. या घटनेनंतर तातडीने बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. रेल्वेने हेल्पलाइन क्रमांक देखील जारी केले आहेत.






