
झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कार्यक्रम पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेले लिटिल चॅप्म्स त्यांच्या गाण्याने सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ २०२३ चा महाअंतिम सोहळा शनिवार २५ नोव्हेंबरला पार पडला. यावेळी मुंबईची श्रावणी वागळे, गोव्याचा हृषीकेश ढवळीकर, जयेश खरे, छोटा पॅकेट मोठा धमाका देवांश भाटे, गीत बागडे आणि कोपरगावची गौरी अलका पगारे हे लिटील चॅम्प्स टॉप ६ मध्ये होते. या अटीतटीच्या स्पर्धेत कोपरगावच्या ‘गौरी अलका पगारेने’ विजेती होण्याचा मान पटकावला.







