
फलटण (सातारा)दि. 25 ऑक्टोबर 2025. :- गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या रोस्टर बिंदू नामावली चळवळीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदीप फणसे यांनी आज वंचित बहुजन आघाडी मध्ये अधिकृत पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश युवा नेते आदरणीय सुजात प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाला.
या प्रसंगी राज्य उपाध्यक्ष प्रा. सोमनाथ साळुंखे सर, तसेच सातारा जिल्हा पूर्व आणि पश्चिम येथील सर्व विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मा. संदीप फणसे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करताना सांगितले की, “सातारा जिल्ह्यात पक्ष बळकट करण्यासाठी मी माझ्या सर्व ताकदीने काम करीन. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे खाते उघडणारच,” असा ठाम आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्यांच्या या प्रवेशामुळे सातारा जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीस नवचैतन्य मिळाले असून पूर्व आणि पश्चिम दोन्ही जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक घोडदौड सुरू झाली आहे.
सातारा जिल्हा पूर्व अध्यक्ष भीमराव घोरपडे यांनी यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना आवाहन केले की, “मा. संदीप फणसे यांच्या अनुभवाचा आणि कार्यतत्परतेचा लाभ घेत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करावे.”








