Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रअकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती; नागरिकांना...

अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मध्ये मुरूम टाकून रस्त्यांची दुरुस्ती; नागरिकांना दिलासा

अकलूज | प्रतिनिधी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तसेच नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीची गैरसोय दूर करण्यासाठी अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील खड्डे व चिखलयुक्त रस्त्यांवर मुरूम टाकून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रभागातील विविध ठिकाणी मुरूम टाकून रस्ते समतल करण्यात आले असून, पावसामुळे निर्माण झालेल्या अडचणी कमी करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

या कामासाठी नगराध्यक्ष रेश्माताई अडगळे, उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील , प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक सचिनजी देशमुख तसेच नगरसेविका सौ. प्रियांका लखन गायकवाड यांनी विशेष पुढाकार घेतला. नागरिकांच्या मागणीनुसार तातडीने काम सुरू करून रस्त्यांची अवस्था सुधारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त करत नगर परिषद पदाधिकाऱ्यांचे आभार मानले असून, भविष्यातही विकासकामे अशाच गतीने सुरू ठेवावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments