
या चर्चा सोशल मीडियावर आगीसारख्या पसरत असताना, आता रितेश देशमुखने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट करत स्पष्टीकरण दिले आहे. या पोस्टमध्ये, त्याने त्याची पत्नी जिनिलीया डिसूझाच्या गरोदरपणाबद्दल अंदाज लावणाऱ्या एका पोर्टलच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. या स्टोरी पोस्टमध्ये त्याने लिहिले होते, ‘आणखी २-३ असायला माझी काही हरकत नाही. पण, दुर्दैवाने हे खोटे आहे’. अर्थात त्यांच्याकडे काहीही गुडन्यूज नसल्याचे रितेश देशमुखने स्पष्ट केले आहे.








