
केवळ विनोदीच भूमिका नव्हे, तर गंभीर भूमिकांमधूनही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. त्याने आजवर काम केलेले जवळपास सर्व चित्रपट हिट ठरले आहेत. त्याचा काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘वेड’ हा सिनेमा तर मराठी प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरला आहे. आज १७ डिसेंबर रोजी रितेशचा ४५वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…







