
पुढारी ऑनलाईन ; तडाखेबाज फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत याच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. ऋषभ पंत याला आता आगामी IPL साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून फीट घोषित करण्यात आले आहे. याबाबतची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने दिली आहे.
ऋषभ पंतला ३० डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या जीवघेण्या रस्ते अपघातानंतर १४ महिन्यांच्या पुनर्वसन आणि रिकव्हरी प्रक्रियेतून जावे लागले. आता तो आगामी IPL साठी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून फीट असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याने ऋषभ पंत (Rishabh Pant) यांच्या फिटनेसबाबत नुकतेच अपडेट दिले होते. पाँटिंगने म्हटले होते की, २६ वर्षीय ऋषभ पंतने बंगळूर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) यष्टीरक्षक म्हणून सराव सुरू केला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला असून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पंत अनेक अडचणींवर मात करत सध्या तो इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीपूर्वी काही गती मिळविण्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे.
दरम्यान, एनसीएने आधीच पंतला मॅचसाठी फिट प्रमाणपत्र दिले आहे. याचाच अर्थ की पंत आयपीएलमधील सर्व सामने खेळू शकतो. डिसेंबर २०२२ मध्ये भीषण कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. आता यातून त्याने बरा होऊन सराव सुरु केला आहे. पाँटिंगने नमूद केले की पंत चांगल्या फिटनेससाठी प्रशिक्षण घेत आहे आणि त्याच्या प्रगतीवर सतत लक्ष ठेवले जात आहे.
🚨 𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲 𝗼𝗻 𝗥𝗶𝘀𝗵𝗮𝗯𝗵 𝗣𝗮𝗻𝘁:
After undergoing an extensive 14-month rehab and recovery process, following a life-threatening road mishap on December 30th, 2022, @RishabhPant17 has now been declared fit as a wicket-keeper batter for the upcoming #TATA @IPL 2024…
— BCCI (@BCCI) March 12, 2024







