
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. व्हिडीओमध्ये रिंकू ही अरिजितची चाहती असल्याचे स्पष्ट झाले आहे. ते पाहून एका चाहतीने, ‘मॅडम तुम्हाला पाहाण्यासाठी देखील आम्ही असेच उभे असतो’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने ‘तुझी स्माइल खूपच गोड आहे. तू अरिजितला पाहून आनंदी दिसत आहेस’ अशी कमेंट केली आहे.







