Saturday, August 15, 2026
Homeसातारासाहस क्रिडा मंडळ द्वारा आयोजित विकास काकडे यांच्या वाढदिवस व सेवापूर्ती गौरव...

साहस क्रिडा मंडळ द्वारा आयोजित विकास काकडे यांच्या वाढदिवस व सेवापूर्ती गौरव समारंभ 

.फलटणः साहस क्रिडा मंडळ व तथागत भगवान बुद्ध जयंती महोत्सव समिती तसेच म्युनिसिपल कामगार वसाहत द्वारे आयोजित भव्य सेवानिवृत्ती व वाढदिवस सोहळा आज दि ३० मार्च रोजी म्युनिसिपल कामगार वसाहत (महात्मा फुले नगर ) सावित्री फुले सभागृह याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे

हा सत्कार सोहळा हा आपल्या घरातील माणसांकडून घरातील एक जबाबदार कुटुंब प्रमुख म्हणजे विकास वसंतराव काकडे ( उपमुख्याध्यापक )मालोजी शेती माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण यांच्या सेवानिवृत्तीच्या व वाढदिवसाच्या आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बु . चे प्राचार्य सुधीर अहिवळे यांनी केले तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मालोजीराजे शेती विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज चे प्राचार्य डी एन कोळेकर .मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य बी एम गंगावणे  प्राचार्य दादासाहेब चोरमले जाधव सर डी के पवार सर कदम सर हे परिस्थिती होते तर कार्यक्रमाचे आभार मानण्याचे काम  हे उमेश काकडे यांनी केले .

विकास काकडे यांचे प्राथमिक शिक्षण हे इरिगेशन कॉलणी तसेच पोलीस कॉलणी १ली ते ४थीपर्यंत झाले व ५ वी ते ७ वी पर्यंतचे शिक्षण डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक शाळा (२ नंबर ) याठिकाणी झाले माध्यमिक शिक्षण मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण हे मुधोजी महाविद्यालय फलटण याठिकाणी पूर्ण केले , भोर येथे बीएड त्यांनी पूर्ण केले . त्यांचे चुलते जे पुणे विद्यापीठ याठिकाणी सेवेत होते तेथे त्यांना वंचित उपेक्षित गरिब विद्यार्थी ची शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याचे काम असो किंवा समाजातील धम्म चळवळीचे काम असो किंवा सामाजिक चळवळीतील काम असो  हे ते करत असल्यामुळे या सर्व कार्याच्या वैचारिक वारसा व धम्म चळवळीच्या वारसा हा विकास काकडे यांनी पुढील काळात  तसाच चालू ठेवला आहे .त्याप्रमाणे बीएड चे शिक्षण पूर्ण करून फलटण एज्युकेशन सोसायटीच्या नवचैतन्य हायस्कूल गोंदवले बु येथे ज्ञानदान करण्याची सुरुवात केली त्यानंतर आसू -पवारवाडी येथील ज्योतिर्लिंग हायस्कूल येथे त्यांना उत्तम सेवा देण्याचे  ही काम केले . त्यानंतर त्यांना फलटण शहारातील शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाच्या मानबिंदू असलेली फ.ए सोसायटीची मुधोजी माध्यमिक हायस्कूल फलटण येथे एक आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक व उत्तम सहकारी म्हणून ते कार्यरत होते जून २०२३ ते २०२४ पर्यंत मालोजीराजे शेती माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे उपमुख्याध्यापक पदी विकास काकडे यांची पदोन्नती मिळून नेमणूक करण्यात आली होती . फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हि नियुक्ती करण्यात आली होती . याठिकाणी काम करताना प्रशासकिय कामांच्या चांगला अनुभव असल्याने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मनात आपल्या बद्दल कायम आदराचे स्थान त्यांनी निर्माण केले आहे . विकास काकडे यांनी जसे शैक्षणिक क्षेत्रात काम केले तसेच त्यांनी सामाजिक , राजकीय , तसेच धम्म चळवळीत अग्रभागी राहून काम केले आहे .

हिंदी भाषेवर प्रभुत्व असलेल्या विकास काकडे यांनी कला क्रिडा साहित्य व स्काऊट गाईडच्या माध्यमातून आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे . त्यांना या कामासाठी हिंदी राष्ट्रभाषा पुणे हिंदी प्रचार व प्रसार या कार्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात झाले आहे ते महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड राज्यस्तरीय संघटक सदस्य म्हणून सध्या कार्यरत आहेत . तसेच निरंतर शिक्षण या विभागांमध्ये विषय तज्ञ म्हणून आपलं योगदान दिले आहे . विकास काकडे यांनी कायमच सामाजिक , शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देऊन काम केले आहे १९९१ मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले स्मृती शताब्दी वर्षामध्ये फलटण येथील मुधोजी महाविद्यालयामध्ये शिक्षक प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन केले होत . यासाठी पुणे विद्यापीठाचे रजिस्टर नलवडे सर , मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचे सोनकांबळे सर व अर्थतज्ज्ञ तथा आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक नरेंद्र जाधव , जिण आमचं या आत्मचरित्राच्या लेखिका सामाजिक कार्यकर्त्या बेबीताई कांबळे यांनी आपले विचार व्यक्त केले . मुधोजी महाविद्यालय फलटण येथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रांचं अनावर करण्यामध्ये विकास काकडे यांचे योगदान महत्त्वाचे होते

सामाजिक क्षेत्रात करत असताना आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून त्यांनी समाजातील अनेक गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तकांचे वाटण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे केले . कोरोना काळात त्यांनी अनेकांना मदतीच्या हात त्यांना दिला होता उपचारासाठी त्यांनी अनेक रुग्णांना मदत केली . पण याकाळात त्यांच्या घरांच्या आधारवड असलेल्या संपूर्ण कुटुंबाला आपल्या मायेने व आदरयुक्त धाकाने  सर्वांना एका छत्राखाली ठेवणाऱ्या  त्यांच्या मातोश्री प्रेमाताई काकडे यांचे कोरोना काळात  निधन झाले आणि त्याच्यां जाण्याने विकास काकडे आणि काकडे परिवारात कधीही भरून न येणारे नुकसान झाले पण अशा दुःखद प्रसंगातून विकास काकडे व त्यांच्या परिवाराला बाहेर काढण्याचे काम हे प्रेमाताई याच्या सावलीत राहिलेल्या व सर्व सुखदुःखात त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभ्या असणारे , कर्तुत्वाने  शिक्षिका असणारे त्यांच्या पत्नी उषा विकास काकडे या परिवाराच्या मागे ठामपणे  उभ्या  राहिल्या कुटुंब एक संधी ठेवण्याचे काम त्यांना केले  तसेच त्यांचे  ही योग्यदान  विकास काकडे यांचा जीवनात खूप मोठे आहे .


सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी धम्म चळवळीत ही एक उत्तम प्रकारे काम करत आहेत . फलटण शहरात धम्म चळवळीत काम करत असताना त्याचे चुलते प्रल्हाद काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली १९९२ मध्ये श्रामणेर शिबीर घेऊन तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समिती स्थापन करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम सुरू करून ते आजपर्यंत चालू ठेवले आहे . रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे मानून त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे असो किंवा व्याख्यानमाला सारखे कार्यक्रम असो , रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप असो अनेक कोणतेही कामासाठी  विकास काकडे सर हे उपलब्ध असतात . तसेच राजकीय क्षेत्रात काम करीत असताना त्यांचे काका माजी नगरसेवक हरिष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक ,राजकिय तसेच सांस्कृतिक , क्षेत्रात ही ते उत्तम काम करत आहेत .

ज्याप्रमाणे वरील सर्व क्षेत्रात विकास काकडे उत्तम प्रकारे काम करत आहेत असेच अजून एक त्यांचे आवडत छंद म्हणजे कुटुंबातील सदस्यांना बरोबर घेऊन देशात व परदेशात पर्यटन करणे  जसे की नेपाळ भूतान थायलंड तसेच बोधगया  अनेक राज्यात  त्यांनी पर्यटन केले आहे . ,तसेच मित्र परिवाराला ही  बरोबर घेऊन अनेक राज्यात पर्यटन केले आहेत . आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे विकास काकडे यांनी  त्यांच्याबरोबर असणाऱ्यांना मित्र परिवाराला सुसंस्कृत स्वाभिमानी बनवण्याचे कार्य ही  यांनी केले आहे ते सर्व मित्र परिवारातील सुख दुःखात खंबीरपणे त्याच्या बरोबर उभे राहतात , विकास काकडे हे मैत्रीच्या दुनियेत राजा माणूस आहेत, त्यांच्या बरोबर असणारे सहकार्यांचे ते मार्गदर्शक गुरुवर्य व आधारवड आहेत .

आपण आपल्या सेवेच्या काळात शिक्षणरुपी ज्ञानगंगेचे उपासक व प्रसारक आणि शिक्षण क्षेत्रात ज्ञानदेवतेच्या ज्ञानदानाचे तसेच शिक्षण क्षेत्राच्या पलिकडे जाऊन आपले उत्तुंग सामाजिक कार्य आपणास इतरांपासून वेगळे ठरवते. आपल्या आदर्श शिक्षक व उपप्राचार्य पदाच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सलाम सेवानिवृत्तीच्या व वाढदिवसाच्या  हार्दिक शुभेच्छा !

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments