
११ पंचायत समित्यांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित; नियोजन भवनात दुपारी १२ वाजता सोडत कार्यक्रम
सातारा : जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील सभापती पदांसाठी प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठीची सोडत मंगळवार, दिनांक ७ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन, सातारा येथे होणार आहे. या सोडतीकडे विशेषतः फलटण तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे, कारण फलटण पंचायत समितीवर कोणत्या प्रवर्गाचे आरक्षण लागते यावर राजकीय समीकरणे ठरणार आहेत.
उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी तसेच नागरिकांना या सोडत कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार, पुढीलप्रमाणे प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे:
- अनुसूचित जाती (महिला) – १
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – २
- नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला) – १
- सर्वसाधारण (महिला) – ३
- सर्वसाधारण (खुला) – ४
एकूण ११ पंचायत समित्यांच्या सभापती पदांसाठी ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. या सोडतीनंतर जिल्ह्यातील स्थानिक राजकारणाला चालना मिळणार असून, संभाव्य इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे.








