
खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेल्या मुंबई महापालिकेच्या जोगेश्वरीतील एका भूखंडावर वायकर यांनी आलिशान हॉटेल बांधल्याचा आरोप आहे. याच प्रकरणात ईडीनं त्यांच्यासह त्यांची पत्नी मनीषा वायकर, व्यावसायिक भागीदार आसू निहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.





