Ravindra Berde Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!

0
18
Ravindra Berde Passes Away: ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; ७८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!


Actor Ravindra Berde Passes Away: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ दिग्गज अभिनेते रवींद्र बेर्डे यांचे आज निधन झाले आहे. वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर कर्करोगाचे उपचार सुरू होते. घशाचा कर्करोग झाल्याने त्यांना मुंबईतील टाटा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची ही कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली. नियमित उपचार करून त्यांना दोन दिवसांपूर्वीच घरी आणण्यात आले होते. मात्र, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने राहत्या घरीच त्यांचे निधन झाले. रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे थोरले बंधू होते.



Source link