
Ratna Pathak Birthday Special: मनोरंजन विश्वात आतापर्यंत अनेक हिंदू-मुस्लिम अभिनेते-अभिनेत्रींनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली आहे. यामध्ये कोणी हिंदू विधीनुसार सात फेरे घेतले, तर कुणी निकाहनामा वाचून लग्न केलं. पण, हिंदी चित्रपटसृष्टीत एक जोडपं असं आहे की, ज्यांनी ना निकाहनामा वाचाल, ना सात फेरे घेतले, ना कोणता समारंभ आयोजित केला. मग, यांचे लग्न नेमके कसे झाले? ही जोडी आहे बॉलिवूड अभिनेत्री रत्ना पाठक आणि अभिनेते नसीरुद्दीन शाह. अभिनेत्री रत्ना पाठक आणि अभिनेता नसीरुद्दीन शाह यांचे लग्न कसे झाले, ते जाणून घेऊया…






