
पुढारी ऑनलाईन डेस्क : Ranji Trophy Final : मुंबईने दिलेल्या 538 धावांच्या विशाला लक्ष्याचा पाठलाग करताना विदर्भ संघाने झुंझार खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी विदर्भच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला आणि दिवसाअखेर 5 बाद 248 धावांपर्यंत मजल मारली. यादरम्यान, करुण नायरने सर्वाधिक 74 धावा केल्या. तर अक्षय वाडकर 56 धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. विदर्भाला विजयासाठी 290 धावांची गरज आहे, तर मुंबईला 42 व्यांदा विजेतेपद पटकावण्यासाठी 5 विकेट्सची आवश्यकता आहे.
विदर्भाने पहिल्या सत्रात गमावले 2 गडी
विदर्भने बुधवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी बिनबाद 10 च्या पुढे खेळायला सुरुवात केली. 19 व्या षटकात विदर्भला पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. त्याला शम्स मुलाणीने पायचीत केले. तायडेने 64 चेंडूत 4 चौकार फटकावत 32 धावा केल्या. यानंतर 20 व्या षटकात 65 धावांवर विदर्भाला दुसरा धक्का बसला. ध्रुव शौरे क्रीजवर थांबून मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. तो 28 धावांची इनिंग खेळून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला तनुषने क्लीनबोल्ड केले. उपाहाराअखेर विदर्भाने या 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 104 धावा केल्या.
Captain leading from the front 👌
Akshay Wadkar gets to his 5⃣0⃣ in style with a 6 🔥#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #Final | #MUMvVID
Follow the match ▶️ https://t.co/k7JhkLhOID pic.twitter.com/OZQcW9A5uy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2024
विदर्भचा दुसऱ्या सत्राचा खेळ
ध्रुव शोरे बाद झाल्यानंतर आलेला अमन मोखाडेही संघाला संकटातून बाहेर काढू शकला नाही आणि तो 32 धावा करून बाद झाला. मधल्या फळीतील फलंदाज यश राठोडला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तो 7 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 133 धावांवर विदर्भाने चार विकेट गमावल्या होत्या. अडचणीत सापडलेल्या विदर्भने चौथ्या दिवसाच्या चहापानाच्या वेळेपर्यंत 4 गडी गमावून 155 धावा केल्या होत्या.
नायर-वाडकर यांची संघर्षपूर्ण भागिदारी
कठीण काळात अनुभवी करुण नायरने प्रथम श्रेणी कारकिर्दीतील 31वे अर्धशतक झळकावले. मुंबईच्या भक्कम गोलंदाजीसमोर त्याने चिवट फलंदाजीचे प्रदर्शन केले. मात्र, तो शेवटच्या सत्रात 74 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात 220 चेंडूंचा सामना केला. त्याने कर्णधार अक्षय वाडकरसोबत पाचव्या विकेटसाठी 95 धावांची भागीदारी केली. यानंतर वाडकरने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि विकेट हर्ष दुबेच्या साथीने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत विकेट पडू दिली नाही. वाडकर 56 तर दुबे 11 धावा करून नाबाद परतले.
मुंबईचा दुसरा डाव, मुशीरचे दमदार शतक
पृथ्वी शॉ 11 धावा, भूपेन लालवाणी 18 धावा, अजिंक्य रहाणे 73 धावा, श्रेयस अय्यर 95 धावा, हार्दिक तामोर 5 धावा, मुशीर खान 136 धावा, शार्दुल ठाकूर शून्य, तनुष कोटियन 13 धावा करून बाद झाले.यानंतर अखेर शा. मुलानी 50 धावा केल्या. धावांची नाबाद खेळी खेळली. तर शार्दुल ठाकूरला खातेही उघडता आले नाही. तनुष कोटियनने 13, तुषार देशपांडेने 2 धावा केल्या.
विदर्भाचा पहिला डाव
शार्दुल ठाकूरने ध्रुव शौरेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याला खातेही उघडता आले नाही. तर धवल कुलकर्णीने अमन मोखाडे आणि करुण नायरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अमन आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी करुणला खातेही उघडता आले नाही. विदर्भाने तीन गड्यांच्या मोबदल्यात 31 धावांवर दुसर्या दिवशी खेळण्यास सुरुवात केली आणि पहिला धक्का अथर्व तायडेच्या रूपाने बसला. धवल कुलकर्णीने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अथर्वला 23 धावा करता आल्या.
यानंतर शम्स मुलाणी यांचा कहर पाहायला मिळाला. त्याने आदित्य ठाकरे, अक्षय वाडकर आणि हर्ष दुबे यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. आदित्यला १९, अक्षयला पाच आणि हर्षला एक धाव करता आली. यानंतर तनुषने तीन गडी बाद करत विदर्भाचा डाव गुंडाळला. त्याने यश राठोड (27), यश ठाकूर (16) आणि उमेश यादव (2) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यश राठोडने सर्वाधिक धावा केल्या. मुंबईकडून शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळणाऱ्या धवल कुलकर्णीने तीन बळी घेतले. त्याचवेळी शम्स मुलानी आणि तनुष कोटियन यांनीही प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. शार्दुलला एक विकेट मिळाली.
शार्दुल ठाकूरची झूंजार खेळी, मुंबईचा पहिला डाव 224 धावांवर आटोपला
मुंबईची सुरुवात चांगली झाली. पृथ्वी शॉ आणि भूपेन लालवानी यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी केली. यश ठाकूरने ही भागीदारी तोडली. त्याने भूपेनला अक्षयकरवी झेलबाद केले. त्याला 37 धावा करता आल्या. यानंतर हर्ष दुबेने पृथ्वीला क्लीन बोल्ड केले. त्याला 46 धावा करता आल्या. या दोन विकेट्सनंतर विकेट्सची झुंबड उडाली. मुशीर खान सहा धावा करून बाद झाला, कर्णधार अजिंक्य रहाणे सात धावा करून, श्रेयस अय्यर सात धावा करून आणि हार्दिक तामोरे पाच धावा करून बाद झाला. मुंबईच्या पहिल्या डावात शार्दुल ठाकूरच्या ७५ धावा निर्णायक ठरल्या. शम्स मुलानी 13 धावा करून बाद झाला.
A V Wadkar 53 runs in 80 balls (6×4, 1×6) Vidarbha 239/5 #MUMvVID #RanjiTrophy #Elite #Final Scorecard:https://t.co/L6A9dXXPa2
— BCCI Domestic (@BCCIdomestic) March 13, 2024