फलटण – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर ११ ऑक्टोबर २०२४ रोजी फलटणमध्ये एक भव्य शक्तिप्रदर्शन करणार आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सभेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून आमदारकीच्या उमेदवारीबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर होणार आहे .
हे शक्तिप्रदर्शन फलटण येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या मैदानावर सकाळी १० वाजता आयोजित केले आहे, जयकुमार शिंदे यांनी या ऐतिहासिक सभेसाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची लोकप्रियता आणि त्यांनी केलेले कार्य यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यांच्या निर्णयामुळे फलटण आणि कोरेगाव विधानसभा क्षेत्रातील राजकीय समीकरणे प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सध्या, या सभेच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे, आणि स्थानिक भाजप कार्यकर्ते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहोरात्र काम करत आहेत.