Ranbir Kapoor: केकवर दारू ओतत रणबीर कपूर असं काय म्हणाला की नेटकरीही संतापले? Video Viral

0
16
Ranbir Kapoor: केकवर दारू ओतत रणबीर कपूर असं काय म्हणाला की नेटकरीही संतापले? Video Viral


Ranbir Kapoor Viral Video: बॉलिवूडमध्ये मोठा दबदबा असणारं कपूर कुटुंब प्रत्येक सण जोरदार पद्धतीने साजरा करतं. प्रत्येक सणाच्या निमित्ताने एकत्र जमून सगळे कपूर जल्लोष करतात. आता नुकताच नाताळच्या निमित्ताने कपूर कुटुंबाचा हा जल्लोष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. नाताळाच्या सेलिब्रेशनसाठी रणबीर कपूर, आलिया भट्टपासून ते सगळेच कपूर आणि बॉलिवूडमधील काही जवळची मित्रमंडळी मिळून पार्टी करताना दिसली होती. या दरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. मात्र, यातील एका व्हिडीओवर नेटकरी चांगलेच संतापले आहेत. हा व्हिडीओ रणबीर कपूरचा असून, त्याच्या एका कृतीमुळे सध्या अभिनेता चांगलाच ट्रोल होत आहे.



Source link