
Ramdas Athawale On Raj Thackeray : रिपाई (आठवले गट) अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पुन्हा डिवचले आहे. मनसेला महायुतीत घेण्याची गरज नसल्याचं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे. नाशिकमधील पत्रकार परिषदेत त्यांनी हे मत व्यक्त केलं. रामदास आठवलेंनी आपल्या खास शैलीत राज ठाकरे तसेच उद्धव ठाकरेंवरही टीका केली. त्याचबरोबर ईव्हीएमच्या मुद्यावरूनही विरोधकांनाही खडे बोल सुनावले.







