Ramayan lectures in Madrasahs | आता मदरशांमध्येही गिरवले जाणारा रामायणाचे धडे; विशेष शिक्षकांची नियुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Ramayan lectures in Madrasahs | आता मदरशांमध्येही गिरवले जाणारा रामायणाचे धडे; विशेष शिक्षकांची नियुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)


आता मदरशांमध्येही गिरवले जाणारा रामायणाचे धडे; विशेष शिक्षकांची नियुक्ती

उत्तराखंडातील मदरशांमध्येही रामायण धडे गिरवले जाणार आहे. यामुळे मुस्लीम मुलांना या संस्कृतीविषयी माहिती कळेल आणि त्यांनी इतिहास समजेल अशी भूमिका वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घेत ही घोषणा केली आहे.

उत्तराखंड : अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडल्यानंतर देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र रामनाम घेतले जात आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडातील मदरशांमध्येही रामायण (Ramayan) धडे गिरवले जाणार आहे. यामुळे मुस्लीम मुलांना या संस्कृतीविषयी माहिती कळेल आणि त्यांनी इतिहास समजेल अशी भूमिका वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घेत ही घोषणा केली आहे. त्यांना अनेकांना विरोध दर्शवण्यात आला असला तरी ते आपल्या निर्णयावर ठाम (Ramayan lectures in Madrasahs) असल्याचे देखील शादाब शम्स यांनी सांगितले.

उत्तराखंडातील 117 मदरशांमध्ये हे रामायणाचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर संस्कृत, वेद, पुराणं याचे देखील शिक्षण दिले जाणार आहे. रामायण शिकवण्यासाठी मदरशांमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे. यापूर्वी शादाब शम्स यांनी सांगितले होते की, आतापासून मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाईल, तर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. काझमी यांनी मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान देण्याबाबतही सांगितले होते. या विधानांना मोठा विरोध झाला असला तरी आता मंडळाकडून रामायण शिकविण्याची चर्चा सुरू झाली आहे.






Source link