
पुढील वर्षी २२ जानेवारी २०२४ रोजी राम मंदिरात राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमानंतर राम मंदिर दर्शनासाठी खुले केले जाईल. यूपीचे मंत्री जयवीर सिंह यांनी सांगितले की, ११ नोव्हेंबर रोजी दीपोत्सव कार्यक्रम होईल. मागच्या वेळी १७ लाख दिवे जाळून गिनीज बुक ऑफ रिकॉर्डमध्ये नोंद केली होती. यावेळी हे रेकॉर्ड तोडण्यासाठी २१ लाख दिवे लावण्याचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर दिवाळीपासून २२ जानेवारीपर्यंत विविध रामलीलांचे सादरीकरण अयोध्येत होणार आहे. त्याचबरोबर शरयू नदीवर लेजर शो होणार आहे.







