Ram Mandir Fact Check | राम मंदिराचा ‘तो’ फोटो खरा की खोटा?जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो मागचे सत्य | Navarashtra (नवराष्ट्र)

0
13
Ram Mandir Fact Check | राम मंदिराचा ‘तो’ फोटो खरा की खोटा?जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो मागचे सत्य | Navarashtra (नवराष्ट्र)


राम मंदिराचा ‘तो’ फोटो खरा की खोटा?जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो मागचे सत्य

अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असून रामभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर मोठे दावे केले जात आहेत.

22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील श्री रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. त्यामुळे जगभरातील राम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आजपासून अयोध्येत सात दिवसीय धार्मिक विधी सुरू झाला असून कार्यक्रमाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. दरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर मोठे दावे केले जात आहेत. एक बातमी व्हायरल होत आहे ज्यामध्ये बाबरी मशिदीपासून तीन किलोमीटर अंतरावर राम मंदिर बांधले जात असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर एका यूजरकर्त्याने गुगल मॅपचा स्क्रीनशॉट शेअर केला असून गुगल मॅपमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशीद या दोन वेगवेगळ्या जागा दाखवल्या जात आहेत. एक जागा जिथे बाबरी मशीद अस्तित्वात होती आणि दुसरी जागा जिथे राम मंदिर बांधले जात आहे. याचा अर्थ बाबरी आहे तिथे मंदिर बांधले जात नाही, असे म्हटले आहे.





Source link