
पंतप्रधान मोदींनी एक्स (आधीचे ट्विटर) वर म्हटले की, हे माझे सौभाग्यआहे की, या ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार बनण्याची संधी मिळत आहे.पीएम मोदींनी ट्रस्टच्या सदस्यांशी झालेल्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. त्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये ट्रस्टच्या पदाधिकारी त्यांना निमंत्रण पत्र देताना दिसत आहेत. न्यासच्या देखरेखीत त्या स्थानावर भव्य मंदिराचे निर्माण होत आहे. भक्तांचे म्हणणे आहे की, तेथे प्रभू रामाचा जन्म झाला होता.








